Total Pageviews

Friday, February 18, 2011

हवय काय?

आई बाबा आणि शिक्षक मारतील म्हणुन नववी पर्यंत अभ्यास केला, शरमेने मान खाली राहु नये म्हणुन दहावीला अभ्यास केला, कॉलेज सुटु नये म्हणुन बारावीला अभ्यास केला आणि चांगला जॉब मिळावा म्हणुन टी.वाय. ला अभ्यास केला. बाहेर आल्यावर पाहीले तर इथे सगळॆच ग्रॅज्युएट म्हणुन मास्टर्स केल. मास्टर्स केल्यावर हे म्ह्णतात अस नसत तुमच्यात ते गुण असाअवे लागतात. ते गूण अंगी बाळगल्यानंतर हे म्हणतात. "कस वर्क एक्स्पिरीयन्स असेल तर बर असत, अहो हल्ली गाढवाला जरी शाळेत टाकल तरी त्याला ही लोक डॉक्टर करतील". सर्व अपेक्षा पुर्ण केल्यावर कामाला घेतात, पण त्याच वेळेला धमकावुन ठेवतात ’ बघु तुम्हाला कस जमत त्यावर डीपॆंड करत" . शिकुन आलेल्या सर्व गोष्टी केल्या की म्हणतात ’ तुमच्या कडे क्रिअ‍ॅटीवीटी नाहीये’ आणि नवीन केल्यावर ’तुम्हांला जेवढ सांगितल जात तेवढ्च करा’ अस म्हणतात. आता मला या सर्वांना एकच विचारायचय " अरे भोसडीच्या तुला नेमक हवय काय?"

No comments:

Post a Comment