Total Pageviews

Saturday, September 25, 2010

बे एके बे आणि बे दुणे चार!!

कधी कोणीतरी आपल असाव अस प्रत्येकाला वाटत पण याच गरजेतुन किंवा प्रेमाच्या आंधळेपणातुन आपण चुकीच्या नात्यांमध्ये गुंतले जातो, तो गुंता आयुष्यभर सुटत नाही. याचा त्रास या दोघांनाही आणि त्या दोघांनाही होतो.
तो सकाळी उठला, रात्री उशिरा पर्यंत दारुपीत बसला होता. अंथरुणातच लोळत होता. त्याने तिला फ़ोन लावला ‘मला भेटायच आहे’ मी तुला हजारदा सांगितल तुझा माझा संबंध नाही, मी माझ्या नव-या बरोबर सुखी आहे तुला शरम नाही वाटत मला भेटायला यायला सांगायला? ‘यात शरम कसली त्यावेळी तर तु रडत होतीस की मी तुझ्या शिवाय जगु शकत नाही आणि आता काय झाल’ या गोष्टीला आता ७ वर्ष झाली आहेत आणि तु हे मला सांगतोयस अरे शलाका बरोबर लग्न करतांना तर तु मला म्हणाला होतास की मी आणि तु कधीच एकत्र जगु शकत नाही ‘मला वेड लागल होत, मी चुकलो होतो शलु तुसुध्दा मला समजुन नाही घेणार तर कॊण घेणार?’ ठिक आहे मी तुला भेटेन पण मला जास्त वेळ थांबता नाही येणार, मी यावेळी हॉटेल मध्ये नाही येणार आपण दुसरीकडे भेटु ? ‘प्लीज आपण हॉटेल मध्येच भेटु, तिथे एकांत असतो बसुन बोलता येत’ बोलता येत की?....... ‘हे सर्व आपण भेटुन बोलु जाऊदे तु ये तर’
ती आता दर शुक्रवारी त्याला त्याच हॉटेल मध्ये भेटते. दोघॆही ४ तासांसाठी जगाला, नात्यांना विसरुन एकरुप होतात. त्याला ते कधीच चुकीच वाटल नाही, ती सुरुवातीला नकारावर अडुन होती पण तो तिला नेहमीच आणाभाकांच्या आठवणींमध्ये नेऊन ठेवतो. तो आता बायकोशी व्यवस्थित बोलत नाही घरी फ़क्त झोपायला जातो आणि आथवण आली की तिला फ़ोन करतो. तिच्या नव-याला तिने धाकातच ठेवले आहे तो उगाचचे प्रश्न विचारत नाही, पण शेजा-यांना याच विषयावर चर्चा करतांना एकल्यानंतर तो घुम्यासारखा घर ते ऑफ़िस आणि ऑफ़िस ते घर एवढ्यातच त्याच आयुष्य संपते.
शाळेतली गणित अगदी बरोबर असतात. बे एके बे आणि बे दुणॆ चार!!

1 comment:

  1. मला हे थोडंसं कम्फुजिंग वाटतंय. नातं स्पष्ट होत नाहीय.नात्याचा फारच वर वरचा विचार झालाय. नाती अशीच असतात. जेव्हढी सरल वाटतात तेव्हढी कॉम्प्लेक्स असतात. पण लिहताना थोडी स्पष्ट करुन लिहावी लागतात. ते इथं दिसत नाहीय. दोघांचे कैरेक्टर पुर्ण तयार होत नाहीयेत. ते व्हायला हवीत. नाहीतर सर्वच अर्धवट वाटत राहिल.याचा विचार कर. थोडेसं कम्फुजिंग होतंय एव्हढच. बाकी स्टाईल छान आहे. पण थोडा कैरेक्टरवर आणि त्यांच्या बिहेवीयरवर आणखी विचार व्हायला हवा. तर तो बे एके बे आणि बे दुणे चारचा विचार स्पष्ट होईल

    ReplyDelete