एखाद्या वयात आलेल्या मुला प्रश्न विचारा की तुला कोणती मुलगी आवडते, उत्तर म्हणजे त्याने पहिलेली सर्वात सुंदर मुलीच नाव. हाच प्रश्न एखाद्य मुलीला विचार आणि बघा ती एखाद्या हुशार मुलाच नाव घेते की नाही ते, घेतलच पाहीजे. बर हे प्रेम म्हणजे कुठल्या जुन्या ग्रंथातील आणि चित्रपटातील प्रेम राहील नाही तर ते आता "प्रॅक्टीकल" झाल आहे, म्हणजे आता झाडा भोवती फ़िरुन गाण्याचे दिवस सरले. या प्रॅक्टीकल प्रेमाचा जोम एवढा असतो कि तो मरीन ड्राईव्हच्या कट्ट्यापासुन ते ठाण्याच्या उपवनापर्यंत आपल्याला दिसतो. कधीतर रस्त्याच्या दोनी बाजुला एवढ प्रेम दिसुन येत कि अस वाटता जगातील सर्व प्रेम वाटण्याची मोनोपोली ह्यांनीच घेतली आहे. आम्ही हे सर्व धंदे करीत नाही कारण आपल्याला झेपत नाही. आम्ही पटवुन कधी ट्रॅफ़िक हवालदाराने आम्हांला सोडल नाही तर मुली ही फ़ार लांबची बाब. आमच प्रेम हे रस्त्यात कुठेही जन्माला येत आणि तिथेच संपते या प्रक्रीयेला आम्ही "तुझी काळीवाली माझी निळीवाली" अस आम्ही आभिमानाने म्हणतो. अगदी बसल्या जागेवरुन मुलीला घरापर्यंत कस सोडतात हे सुध्दा आम्हांला येत, ती दिसायला लागल्या पासुन ती ते अगदी दिसेनासी होई पर्यंत आही तिला निरखत राहतो. यात आम्हांला काही वावग वाटत नाही कारण आमच्या मते आम्ही कही फ़ालतु पणा केलेला नाही. आणि आम्हांला पोरी पटत नाहीत याचा आम्हांला अभिमान वाटतो. आमच्या प्रेमात पैसे खर्च होत नाहीत. कधी करुन बघा मजा येईल आणि मजा नाही आली तर तुमच कुठं तरी चुकल अस समजा. आम्हांला भेटा आम्ही तुम्हांला नक्कीच मदत करु..
आपले विश्वासु
मॅचो नाका
No comments:
Post a Comment