Total Pageviews

Saturday, September 25, 2010

बे एके बे आणि बे दुणे चार!!

कधी कोणीतरी आपल असाव अस प्रत्येकाला वाटत पण याच गरजेतुन किंवा प्रेमाच्या आंधळेपणातुन आपण चुकीच्या नात्यांमध्ये गुंतले जातो, तो गुंता आयुष्यभर सुटत नाही. याचा त्रास या दोघांनाही आणि त्या दोघांनाही होतो.
तो सकाळी उठला, रात्री उशिरा पर्यंत दारुपीत बसला होता. अंथरुणातच लोळत होता. त्याने तिला फ़ोन लावला ‘मला भेटायच आहे’ मी तुला हजारदा सांगितल तुझा माझा संबंध नाही, मी माझ्या नव-या बरोबर सुखी आहे तुला शरम नाही वाटत मला भेटायला यायला सांगायला? ‘यात शरम कसली त्यावेळी तर तु रडत होतीस की मी तुझ्या शिवाय जगु शकत नाही आणि आता काय झाल’ या गोष्टीला आता ७ वर्ष झाली आहेत आणि तु हे मला सांगतोयस अरे शलाका बरोबर लग्न करतांना तर तु मला म्हणाला होतास की मी आणि तु कधीच एकत्र जगु शकत नाही ‘मला वेड लागल होत, मी चुकलो होतो शलु तुसुध्दा मला समजुन नाही घेणार तर कॊण घेणार?’ ठिक आहे मी तुला भेटेन पण मला जास्त वेळ थांबता नाही येणार, मी यावेळी हॉटेल मध्ये नाही येणार आपण दुसरीकडे भेटु ? ‘प्लीज आपण हॉटेल मध्येच भेटु, तिथे एकांत असतो बसुन बोलता येत’ बोलता येत की?....... ‘हे सर्व आपण भेटुन बोलु जाऊदे तु ये तर’
ती आता दर शुक्रवारी त्याला त्याच हॉटेल मध्ये भेटते. दोघॆही ४ तासांसाठी जगाला, नात्यांना विसरुन एकरुप होतात. त्याला ते कधीच चुकीच वाटल नाही, ती सुरुवातीला नकारावर अडुन होती पण तो तिला नेहमीच आणाभाकांच्या आठवणींमध्ये नेऊन ठेवतो. तो आता बायकोशी व्यवस्थित बोलत नाही घरी फ़क्त झोपायला जातो आणि आथवण आली की तिला फ़ोन करतो. तिच्या नव-याला तिने धाकातच ठेवले आहे तो उगाचचे प्रश्न विचारत नाही, पण शेजा-यांना याच विषयावर चर्चा करतांना एकल्यानंतर तो घुम्यासारखा घर ते ऑफ़िस आणि ऑफ़िस ते घर एवढ्यातच त्याच आयुष्य संपते.
शाळेतली गणित अगदी बरोबर असतात. बे एके बे आणि बे दुणॆ चार!!

Friday, September 17, 2010

शाळेचा दिवस

नमस्कार मी पंकज सुभाष लाड, वय २१ राहणार पवई,मुंबई गावाच नाव रिंगणे आज पासुन संकल्प करतोय ब्लॉग लिहण्याचा.
माझ मन फ़ार उतावळ असत प्रत्येक गोष्टी साठी. मी या जगात का आलो, काय, करतोय, काय करेन कशाचीच माहिती नाहीये.पण कधीतरी अस वाटत जस जगतोय तसच जगाव यापेक्षा चांगल म्हणजे नक्की काय! चांगल होण्यासाठी कोणती किंमत मोजावी लागेल. लहानपणी वाटत होत लवकर लवकर मोठ व्हाव आता वाटतय ते दिवस, त्या आठवणी किती सुंदर होत ते जग, सकाळी उठा, डॊळे चोळा आजुबाजुला बघा अरे! गिशु अजौन झोपलीय दरवाज्याच्या बाहेरुन शेजार-यांचा आवाज येतोय. दरवाजा उघडायचा तर बाहेर सगळॆ शेजारचे मित्र शाळेची लाल चड्डी आणि पांढरा शर्ट घालुन तयार! शाळा???? वैताग येणार आहे पण जगाचा नियमच आहे म्हणुन जायच नाहीतरी मित्र सोडले तर मला शाळेत दुसरी कोणतीच गोष्ट आवडली नाही. पण जायला तर पाहीजे, उशिर झाला म्हणुन अतुलची आई ऒरडेल, मी तयारी केली गिशुला जाताना दरवाजा घट्ट लावुन घ्यायला सांगितला, दहा मिनिटाच्या अंतरावर शाळा अजुन सकाळची शाळा सुटली नाही. अरे!आज सोमवार तो सुध्दा श्रावणातला, म्हणजे शाळॆत प्रसादीसाठी चणे घेउन जायला पाहिजेत.आईला लक्षात असेलना की तिची शाळा सुट्ल्यावर ती चणे न घेऊन येता परस्पर घरी निघुन जाईल.च्यायला आज पण भुगोलाचा ग्रुहपाठ नाही केला. बाई मारतील, चालेल पण बाहेर नको उभ करायला टाइमपास करायला काहीच नाही........आज मी २१ वर्षांचा आहे प्ण मला हे कळत नाही की मी माझी महत्वाची काम करायला कसा विसरतो.