Total Pageviews

Sunday, January 22, 2012

Globalization & Me!


My first Encounter with Globalization!

27th May, 1988, not a bright day for you, but this is the day I was born in Mumbai(at  Ghatkopar, to be specific). No, I don’t of course remember it, it is my parents who told that to me. What I can remember are only those wonderful days and memorable experiences of my childhood. I studied in Marathi-medium school near my residence. I wasn’t a bright student during my schooling when it came to performance in examination and scoring marks. My mother always kept worrying about my studies whereas my father never saw a well educated man in me, but he never showed that he is hopeless about me. Somehow I got through with schooling, completed my graduation with Arts. After completing graduation I also did Masters from Mumbai University in Communication and Journalism.
Getting bored? Thinking why am I writing all these things?
No you are not here to read my autobiography, but I thought I should introduce you to ‘ME’, in case you wanted to know.
  I read the word ‘Globalization’ for the first time in some newspaper. Some workers were protesting against globalization at their workplace. In my childhood I came across many good people but after sometime they happened vanish somewhere. No they haven’t moved to anywhere but their goodness seemed to be vanished suddenly and they went through a complete modification in their behavior. A father who used to guide his son in his studies even after having a very tiring day after work seems to be totally changed. Now he doesn’t have time for his kids, he doesn’t even have time to chat with the neighbors and works on Sundays and Public holidays too. Now he doesn’t have a drink with his friends.  He doesn’t care which programs are on tv. He just works & works. He’s become a complete workaholic. He used to smoke a cigarette after dinner, now he smokes on dinner table. His wife screams & argues with him every night without break. I asked this father of mine “why all this is happening, papa?” He stared at me for a minute and asked me to concentrate on homework. My homework book was so beautiful & clean I never wanted to ruin it, so I never write a word in that notebook. Yes he beat with wooden scale, seeing that I had done no homework even my mom was angry on me. I was crying silently, all alone. 
I asked my teacher about Globalization. She first looked at me and then asked me to go out of the class & tuck the shirt into pants neatly. I did it. I asked my Sir about Globalization, he shouted “oh, lad! I told you to not speak when I am teaching. Leave the class now.” I was a humble student so I went out. I was dreaming of staying out of class for this entire year, but in my sweet dream a witch from the hell arrived, Yes “our sweet lady of love” Headmistress. She took me to her office she asked peon to get my report card. He was so happy for that moment, yes the peon. Headmistress asked me why was I thrown out of my class. I replied , No I wasn’t thrown out , sir requested me. Yes, now her face was red, she looked like devi chandika from some religious movie, my mom never miss this movie on television. Yes, I said sorry, but it was too late as she was beating me with an expensive ply coated wooden scale. Our school always had these kinda scales to keep the students always ‘Motivated’. Yes, I am motivated now for next six months & I came to know that Globalization is so bad that even if you say this word they will punish you. Yes, Globalization is bad!

Monday, October 10, 2011

प्रेम..फ़ुकट

काय सुंदर चांदण पडलय, जग किती सुंदर आहे, अशी वाक्य कोणाच्या तोंडुन एकलीत तर हे सर्व सुविचार म्हणणारी व्यक्ती प्रेमात आकंठ बुडालीय म्हणुन समजा. प्रेम अतिशय वाईट गोष्ट. या प्रेमासाठी कोणी मेलं, कोणी यातना भोगल्या हे मी अनेक मित्रांकडुन एकलय, पण यार प्रेम करुन काय मजा आली हे मी कधीच कोणाच्या तोंडुन ऎकल नाही किंवा मला स्व:ताला याचा कधी अनुभव आला नाही. प्रेम म्ह्णजे फ़ुकटची झंझट आहे बघा. जर ती दिवसभर तुमच्या बरोबर आहे तर ह्या ना त्या गोष्टीचा खर्च आणि बरोबर नसली तर मोबाईलवर बोलण्याचा खर्च. माझ खाजगीत अस मत आहे की आपण गत जन्मी जी काही पाप केली त्याचा हिशोब या जन्मात चुकता करता यावा यासाथी चित्रगुप्ताने प्रेम या छोट्या खात्याची निर्मिती केली पण यातुन मिळणा-या फ़ायद्याकडे बघुन सृष्टीच्या निर्मात्याने या खात्याचा विस्तार करण्यासाठी बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा या तत्वावर मदनाच्या हातात या खात्याची जबाबदारी सोपवली आणि त्या दिवसानंतर जगात चोरी, भांडण, लुट या गोष्टी सुरु झाल्या.
एखाद्या वयात आलेल्या मुला प्रश्न विचारा की तुला कोणती मुलगी आवडते, उत्तर म्हणजे त्याने पहिलेली सर्वात सुंदर मुलीच नाव. हाच प्रश्न एखाद्य मुलीला विचार आणि बघा ती एखाद्या हुशार मुलाच नाव घेते की नाही ते, घेतलच पाहीजे. बर हे प्रेम म्हणजे कुठल्या जुन्या ग्रंथातील आणि चित्रपटातील प्रेम राहील नाही तर ते आता "प्रॅक्टीकल" झाल आहे, म्हणजे आता झाडा भोवती फ़िरुन गाण्याचे दिवस सरले. या प्रॅक्टीकल प्रेमाचा जोम एवढा असतो कि तो मरीन ड्राईव्हच्या कट्ट्यापासुन ते ठाण्याच्या उपवनापर्यंत आपल्याला दिसतो. कधीतर रस्त्याच्या दोनी बाजुला एवढ प्रेम दिसुन येत कि अस वाटता जगातील सर्व प्रेम वाटण्याची मोनोपोली ह्यांनीच घेतली आहे. आम्ही हे सर्व धंदे करीत नाही कारण आपल्याला झेपत नाही. आम्ही पटवुन कधी ट्रॅफ़िक हवालदाराने आम्हांला सोडल नाही तर मुली ही फ़ार लांबची बाब. आमच प्रेम हे रस्त्यात कुठेही जन्माला येत आणि तिथेच संपते या प्रक्रीयेला आम्ही "तुझी काळीवाली माझी निळीवाली" अस आम्ही आभिमानाने म्हणतो. अगदी बसल्या जागेवरुन मुलीला घरापर्यंत कस सोडतात हे सुध्दा आम्हांला येत, ती दिसायला लागल्या पासुन ती ते अगदी दिसेनासी होई पर्यंत आही तिला निरखत राहतो. यात आम्हांला काही वावग वाटत नाही कारण आमच्या मते आम्ही कही फ़ालतु पणा केलेला नाही. आणि आम्हांला पोरी पटत नाहीत याचा आम्हांला अभिमान वाटतो. आमच्या प्रेमात पैसे खर्च होत नाहीत. कधी करुन बघा मजा येईल आणि मजा नाही आली तर तुमच कुठं तरी चुकल अस समजा. आम्हांला भेटा आम्ही तुम्हांला नक्कीच मदत करु..
आपले विश्वासु
मॅचो नाका

Monday, July 18, 2011

फ़िली

आयुष्यात अनेक लोक येतात कित्येक लोक घटकाभर लक्षात राहतात तर काही जण आयुष्यात नसुन सुध्दा आयुष्यभर सोबत देतात. त्यांच्या नुसत्या आठवणीने आपल्या चेह-यावर आनंद खेळुन जातो.
मी अकरावी पासुन रुईया कॉलेजमध्ये शिकत होतो सुरुवातीला माझ्या ग्रुपमध्ये अनेक मित्र शैक्षणिक पाय-या ऒलांडु न शकल्यामुळॆ बारावी पर्यंत येऊन थांबले. एफ़.वाय.बी.ए. चा पहिल्याच दिवसापासुन एकट वाटायला लागल एरवी कट्ट्यावर कोणाची गरजच भासत नव्ह्ती, आपण आपला ग्रुप बस्स. आता आपल्याच कट्ट्यावर जाऊन बसायला विचित्र वाटत होत. सकाळी ८.३० ला येऊन कट्ट्यावर बसलो तिथुनच चहावाल्याला स्पेशल बनवायला सांगितली व दोन महिन्यापासुन पडलेला नित्यक्रम म्हणजे स्टेशनला उतरल्यावर रस्त्याच्या पलिकडे जाऊन सिगरेटच पाकिट घ्यायच आणि मग कॉलेजला जायच. एक दीड तास एकटा बसुन वैतागलो, पुन्हा चहा सांगुया म्हणुन उठलो तर आवाज आला " सन ये बॅग तुम्हारा है क्या ?" मी हो म्हणालो " थोडा उधर रखो ना, ये बैठने का जगा है, सामन रखने का नही" मी पट्कन माझी बॅग उचलली आणि ग्रिल ला लावली आणि चहाची वाट बघत बसलो. ही व्यक्ती म्हातरी आणि बोलायला उध्दट. माझी चहा आली मी सिगरेट पेटवली पण म्हटल धुराचा त्रास नको व्हायला म्हणुन तिथुन चहा उचलुन निघत होतो तर पुन्हा त्याच दरडावण्याच्या सुरातला आवाज "अरे बैठो मेरे को कोई प्रोब्लेम नही है" मी म्हटल "इट्स ओके अंकल, मै बैठ के पक गया हुं" मी त्यांच्या मागच्या कट्यावर जाउन बसलो. एवढ्यात रुईइया मधली एक मुलगी तिथे आली आणि त्या अंकलशी बोलत बसली. मी पण तिला निरखुन बघत होतो. दोघे ही मराठीत बोलत होते मराठी वरुन एवढ तर कळल की अंकल गेल्या सात जन्मातही मराठी म्हणुन जन्माला आले नव्ह्ते.
आता दररोजच झाल होत. बरोबर ९.३० वाजत ते त्यांची वॅगन आर बरोबर कट्ट्यासमोर लावायचे. तिथे दुस-या कोणीही गाडी लावयच नाही. गाडीतुन उतरताना पहिल्यांदा पॅसेंजर सीटवर ठेवलेली काठी बाहेर यायची नंतर अंकल! आता हळु हळु माझ आणि त्यांच बोलण व्हायच. ते दररोज न चुकता बरोबर ९.३० ला कट्ट्यावर य़ायचे, कधी पाउस जोरात असेल तर मात्र त्यांची दाडी व्हायची.
बोलण्या बोलण्यात कळल कि ते पारसी, त्यांच नाव फ़िरोज छापखानावाला, वय वर्ष ७१, बॅक ऑफ़ टोकीयो मधुन रिटायर, रहायला पारसी कॉलनी मध्ये त्यांच्या घरात त्यांची बायको एवढच. जसाजसा वेळ गेला आमची मैत्री दाट झाली होती. दररोज न चुकता ९.३० ला येणारे आणि वरोबर ११ वाजता बायकोचा फ़ोन आल्यावर जाणारे. मला हा माणुस फ़ार आवडायचा कारण तो नेहमी मला त्याच्या काळात घेऊन जायचा आणि त्यांच्या गोष्टी सांगताना तो दीड तास मी जुनी मंबई, ट्राम, त्यावेळेची अर्थ व्यवस्था आणि त्याकाळी मुंबईचे धुतले जाणरे रोड, आठ आण्यात पायधुनी पासुन दादर टीटी पर्यंतचा प्रवास, अंकलने त्यांच्या बायकोला कस पटवल या सर्व गोष्ट जगायचो. एकदा बोलताना कळल की त्यांना एक मुलगी आहे आणि तिने मराठी मुलाबरोबर लग्न केल. लग्नानंतर चार वर्षांनीच तिचा नवरा हार्ट अ‍ॅटॅकने वारला. त्याच्या पासुन तिला एक मुलगी आहे आणिती आता नववीला आहे. मुलगी मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहे. नातीबरोबर खेळायला जीव तुटत असतो पण मुलीने जाती बाहेर लग्न केल्याने तिला पारसी कॉलनी मध्ये कायमस्वरुपी खोली मिळत नाही. ति थोडी लांब राहते. आयुष्यातली सर्व कर्तव्य पार पाडुन रीटायर झाल्यावर बायकोला युरोप फ़िरवुन आलेला माणुस आता नाती ला डॉक्टर करण्यासाठी म्हणुन आपल्याला जमेल तेवढी बचत करुन बॅकेत पैसे साठवतोय.
आजारांची नाव सांगताना दम लागायचा एवढे आजार, पण तरीही कधी अंथरुणाला खिळुन नाही. आयुष्यात जे काही चुकल ते मला सांगतानासुध्दा कचरले नाहीत. मुलीबद्दल बोलताना नेहमी त्यांच मन भरुन यायच. तीन वर्ष होत आली होती. आता दोन महिन्यात माझी परिक्षा होती. हॉल तिकिट घेऊन कट्ट्यावर आलो पण आज अंकल नाही आले. घरी फ़ोन केल्यावर अंटी म्हणाली तब्येत खराब आहे बहुतेक उद्यापण येणार नाही. पण अंकल दुस-या दिवशी हजर त्यांचा आजार फ़ार बळावला होता त्यांना लघवी धरवत नव्हती अगदी १५ सेकंद सुद्धा नाही. माझा शेवट्च्या वर्षाचे पेपर झाले आणि माझ कॉलेजला जाण बंद झाल. जुन महिन्यात एकदा अंकलचा फ़ोन आला. " क्या पंक्या भुल गया क्या तु तेरे अंकलको?" सोमवारी आमच भेटण ठरल मी साडे सात वाजताच कॉलेजला पोहोचलो. ९ ला अंटीने फ़ोन करुन सांगितल "अंकल जब उधर आयेगा तो चलते समय उनका हाथ पकडना नही तो वो गिर जायेगा." अंकल आले मी डि.पी. मध्ये दोन स्पेशल चहा सांगितला आणि अंकल जवळ यॆउन बसलो. अंकलच्या चेह-यार भयंकर थकावट दिसत होती ते ११ वाजे पर्यंत नाही थांबले १०.१५लाच निघाले. मी नंतर एकदा तब्येतीची चौकशी करण्यासाठी फ़ोन केला तो तेवढाच त्यानंतर मी जॉब शॊधण्यात मग्न होतो. एक दिवस अंटीचा फ़ोन आला कि अंकल हॉस्पिट्ल मध्ये आहेत आणि तुला फ़ार विचारतात प्लिज एकदा भेटुन जा मी दुस-या दिवशी माझ्या मित्राला घेउन पारसी जनरल हॉस्पिटल मध्ये गेलो अंकल फ़ार खुश झाले त्यांच्यासाठी मी डी.पी.चा स्पेशल चहानेला होता पण डॉक्टरने त्यांना बाहेरच खाण्यासाठी मज्जाव केला होता. त्यांना तो चहा पिता आला नाही मी म्हणलो लवकर बरे व्हा मग कट्ट्यावर बसुन चहा पिउया. भेटण्याची वेळ संपली मी निरोप घेतला. अंकल बरे झाले आणि त्यांना घरी आणल्याच कळल. मी सुध्दा आता जॉबला होतो त्यामुळॆ रुईयाला जाण पुर्ण बंद झाल होत. डिसेंबर मध्ये फ़ोन आला की अंकल वारले इच्छा असुन सुध्दा त्यांच्या अंत्यविधिसाठी जाता आल नाही. डॊळ्यात पाणी आल. तीन वर्ष आम्ही त्या कट्ट्यावर बसलो आणि तीन वर्षानंतर आमचे मार्ग कायमचे वेगळॆ झाले. आजही कट्ट्यासमोरुन जाताना थांबतो तिथे पाहतो पण एकट बसायची इच्छा होत नाही, मग तसाच निघुन येतो....

Sunday, February 20, 2011

अंगाला झोंबेल एवढा गार वारा आणि थंडी, आकाशात शानदार आणि सुंदर चंद्र. किती सुरेख आणि सुंदर रात्र आहे पण तरीही काही कमी आहे, काय? ती गोष्टच लक्षात येत नाहीये. घरात आलो आणि रेडिऒ चालु केला. ९१ वर अमीन सयानींचा जुना कार्यक्रम पुन्हा वाजवत होते. जुनी गाणी, हातात सिगरेट आणि माझ स्वातंत्र्य, मनावर ही कसल द्डपण नाहीये पण तरीही वाटत की आपण काही तरी विसरतोय. ही गोष्ट मनात दडुन बसलीय बाहेर येऊन मला सामोर जाण्यापेक्षा तिला तिथेच कोप~यात राहुन मला त्रास द्यायचा आहे. येईल, समोर येईल आज फ़क्त मी माझ्या जगात ! मला माझ्या आयुष्यात डॊकावायला फ़ार आवडत आणि आज मी तिथेच हरवणार आहे.

Friday, February 18, 2011

हवय काय?

आई बाबा आणि शिक्षक मारतील म्हणुन नववी पर्यंत अभ्यास केला, शरमेने मान खाली राहु नये म्हणुन दहावीला अभ्यास केला, कॉलेज सुटु नये म्हणुन बारावीला अभ्यास केला आणि चांगला जॉब मिळावा म्हणुन टी.वाय. ला अभ्यास केला. बाहेर आल्यावर पाहीले तर इथे सगळॆच ग्रॅज्युएट म्हणुन मास्टर्स केल. मास्टर्स केल्यावर हे म्ह्णतात अस नसत तुमच्यात ते गुण असाअवे लागतात. ते गूण अंगी बाळगल्यानंतर हे म्हणतात. "कस वर्क एक्स्पिरीयन्स असेल तर बर असत, अहो हल्ली गाढवाला जरी शाळेत टाकल तरी त्याला ही लोक डॉक्टर करतील". सर्व अपेक्षा पुर्ण केल्यावर कामाला घेतात, पण त्याच वेळेला धमकावुन ठेवतात ’ बघु तुम्हाला कस जमत त्यावर डीपॆंड करत" . शिकुन आलेल्या सर्व गोष्टी केल्या की म्हणतात ’ तुमच्या कडे क्रिअ‍ॅटीवीटी नाहीये’ आणि नवीन केल्यावर ’तुम्हांला जेवढ सांगितल जात तेवढ्च करा’ अस म्हणतात. आता मला या सर्वांना एकच विचारायचय " अरे भोसडीच्या तुला नेमक हवय काय?"

मैफ़िल

आज दुपारी ३ च्या सुमारास मी कामासाठी वझॆ केळ्कर कॉलेजला गेलो होतो, तिठे गेल्यावर मला नेहमी वाटायच की किती शांत असतात हे लोक. पण आज तिथल्या टपरीवर सिगारेट ऒढत असताना दोन मुल तिथे आली,पहिला मुलगा बुटका, सड्सडीत उंचीचा आणि त्याने डोळ्यात लेन्स घातल्या होत्या. दुसरा मुलगा फ़ॉर्मल घालुन चष्मा घालुन होता, पहिला मुलागा आला आणि तावातावात म्हणत होता, ’भॆन्चोद खर सांगुया" त्यावर दुसरा म्हणाला बोलुन टाक. त्यानंतर अचानक ५-६ अजुन मंड्ळी आली. लांबुनच शिव्या घालत येत होते त्यामुळे हे त्यांचे मित्र एवढ तरी पक्क होत. त्यांच बोलण सुरु झाल. सर्व मित्र एकत्र येऊन त्यांच्यातल्याच एकाला समजवत होते. मॅटर मुलीचा होता एवढ तरी सिगरेट संपे पर्यंत कळल. निघायच होत पण पाय आणि मन दोघ आता एकत्र झाले होते, मी उगाचच त्यांना ऑकवर्ड वाटायला नको म्ह्णुन दुसरी सिगारेट पेटवली. त्यांच्या बरोबर काढलेल्या त्या १५ मिनिटांमध्ये मी माझ्या आयुष्याची ५ वर्ष पाहिली. पहिल्या प्रेमापासुन ते ब्रेक ऑफ़ पर्यंत प्रत्येक साथ देणारे आणि माझ्याच अंथरुणात येऊन मला हळुच लादीवर ढकलण्या पर्यंत सर्व गोष्टी, आणि या सर्वा गोष्टींचे कारणी भुत माझॆ मित्र सर्वांना मी त्या तिथे , त्या टपरीवर पाहिले. कॉलेजच्या आत जे शिक्षण मिळाल त्या पेक्षा बाहेर बसुन मिळवलेल्या ज्ञानाची कदरच जास्त वाटते.
आज ते मित्र कामा मध्ये आहेत, पण अस वाटत की कधीतरी सर्वांनी तसच पुर्वी सारख कफ़ल्लक होऊन चालत करणजी किंवा अण्णा कडे जाव आणि पुन्हा तोच दंगा घालावा!

Wednesday, February 9, 2011

Just read a good story after a long time, though it contains many abusive words but I am sure that blogger doesn't had any good words for that certain situation. That blogger was a reflaction of mine, every word & every imagination was something I have seen before in my dreams or imagination. people are foolish & emotional. we know these people , they are around us, we know them but we refused to say these things to them because we are scared that if we do tell them they will tell  our dark side to other people. why we are scared , to whom we scare just because we had build an Image in public, friends, relatives,others. we behave with them that way, we dont want to let our Image collapse in mere seconds. why we cant be like animals , & show our true colors !
We are not Different from Animal's we kill for food, sometimes we kill our own kind for food. Differnce is just one "Money" there is no money in jungle.